ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षणासाठी भ्रमणध्वनी/व्हाट्सअॅप क्र. 9860964323 नंबरवर नोंदणी करावी


 

अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींचे आयुष्य आनंदी कसे करता येईल. यासाठी सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व ए एससीओपी या संस्थेमार्फत ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपायोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख या विषयांवरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 हे प्रशिक्षण मर्यादित 30 व्यक्तींना देण्यात येईल. इच्छुक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना या प्रशिक्षणासाठी भ्रमणध्वनी/व्हाट्सअॅप क्र. 9860964323 या नंबरवर आपली नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक