रायगड जिल्हा परिषदेचा डासमुक्त व कचरामुक्त गावांचा संकल्प कंपोस्टखड्डे व शोषखड्डे बांधकामासाठी विशेष मोहिम

 


अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आता निर्मल प्लसच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे विषया समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचे सक्रिय योगदानातून शाश्वत स्वच्छतेसाठी प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावामधील स्वच्छतेत सातत्य राहून जिल्ह्यातील प्रत्येक गावात डासमुक्त व कचरामुक्त व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानातर्फे दि.5 ते दि.12 जानेवारी 2021 या कालावधीत कंपोस्टखड्डे व शोषखड्डे बांधकामासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका आहेत अशा ग्रामपंचायती व्यतिरिक्त इतर ग्रामपंचायतमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. कचरा उघड्यावर पडल्यामुळे गावांना बकाल स्वरुप प्राप्त होवून रोगजंतू वाढीस लागतात, उघड्यावरचा कचरा मानवी आरोग्यास व पर्यावरणास ही धोका निर्माण करतो. यावर पर्याय म्हणून ओला कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावात कंपोस्टखड्डयांची निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. तर सांडपाण्यामुळे डास होवून डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. यासाठी हे सांडपाणी शोषखड्डयात मुरविण्यासाठी प्रत्येक गावात जास्तीत जास्त शोषखड्डे बांधकामास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी, सी.एस.आर.निधी ग्रामपंचायत स्वनिधी किंवा आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून व लाभार्थ्यांकडून साहित्य घेवून काम पूर्ण करावयाचे आहे.

या कामात स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी तसेच एन.एस.एस.चे विद्यार्थ्यांही उर्त्स्फूतपणे सहभागी होवू शकतात. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कंपोस्टखड्डे व जलसंवर्धनासाठी शोषखड्डे उपयुक्त ठरत असल्याने प्रत्येक ग्रामसेवकांनी लोकसहभाग घेवून जास्तीत जास्त शोषखड्डे व कंपोस्टखड्डे बांधून आपली ग्रामपंचायत डासमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी जास्तीत जास्त लोकसहभाग घेवून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.दिप्ती पाटील यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक