ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे मनाई आदेश जारी

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.29 (जिमाका) :- माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि 11 डिसेंबर 2020 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे. 

नवी मुंबई पोलोस आयुक्तालय हद्दीत- परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवाळे, वलप, वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, वाजे, बारवाई, खानावळे, मोर्बे, खैरवाडी, खानाव, पालेबुद्रुक, साई, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत- उसर्ली खूर्द, सांगुर्ली , देवळोली, नानोशी, कोळखे, खादेश्वर पोलीस ठाणे हद्दीत- आकुर्ली, पालीदेवद, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत- फुंडे गाव, उरण पोलीस ठाणे हद्दीत- चाणजे, नागाव, म्हातवली, वैश्वी, मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीत- केगाव एकूण 27 ग्रामपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असन दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व  दि .18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-2  पनवेल विभागातील पनवेल तालुका, पनवेल शहर, खांदेश्वर, उरण, न्हावाशेवा व मोरासागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय स्पर्धेपोटी वादविवाद होवून निवडणुकीच्या कालावधीत दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात चुरस निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिक, राजकीय कार्यकत्यांमध्ये आपसात भाडण, तंटे होवून गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी एखादया गटाकडून, व्यक्तीकडून हत्याराचा दुरुपयोग होवून गंभीर परिस्थती निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी शस्त्राच्या सहाय्याने कोणी मतदारांना धाकदपटशा नये किंवा हत्याराचा दुरुपयोग करु नये, तसेच मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणारत पार पडण्यासाठी व नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 2 पनवेल विभागातील पनवेल तालुका, पनवेल शहर, खांदेश्वर, उरण न्हावाशेवा व मोरासागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

जे इसम शासकीय नोकरीत आहेत व त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्याच्या निमित्ताने शस्त्र बाळगणे, नेणे क्रमप्राप्त आहे अथवा ज्यांना तत्सम अधिकार असलेल्या अधिकाऱ्याने सूट दिली आहे किंवा इतर कोणत्याही शस्त्र परवानाधारक इसमाने शस्त्र बाळगण्याकरिता सूट घेतली आहे, त्यांना हे आदेश लागू राहणार नाहीत.

हे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2, मधील पनवेल तालुका, पनवेल शहर, खांदेश्वर, उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी पोलीस हद्दीतील वर नमूद केलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दि.23 डिसेंबर 2020 च्या दुपारी 12 वाजल्यापासून ते दि.19 जानेवारी 2021 च्या रात्री 12.00 पर्यंत हे मनाई आदेश लागू केले आहेत.

 या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शस्त्र परवानाधारकांवर भारतीय संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई रुपाली अंबुरे यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक