मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -- जिल्हाधिकारी किशन जावळे

 

 रायगड (जिमाका),दि.3:- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता  सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे  यांनी केले.

 राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना  सुरू करण्यात आली आहे.  या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  यापूर्वी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी  सप्टेंबर 2024 मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा.

            0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक