काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
रायगड (जिमाका) दि.04 :- राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज सादर करावयाची मुदत दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला. जी.एस.टी.बील. बँक तपशिल, आधा कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत.
अधिक माहीतीसाठी इच्छूक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि.रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ञ पवन बेड 7218350054 यांचेशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, MIDC कुडाळ, हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे.
00000000
Comments
Post a Comment