ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

 

 

 रायगड, (जिमाका) दि.11:-महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून बसलेले सर्वच्या सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 100 टक्के लागला असल्याची ‍ माहिती  अलिबाग जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी दिली आहे.

            रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयडोंगरे हॉल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षे साठी रायगड जिल्ह्यातून 27 परीक्षार्थी बसले होते. या पैकी सर्व 27             विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असूनरायगड जिल्ह्याची उज्वल यशाची परंपरा या ही वर्षी कायम राखली आहे. 

            या परिक्षेत प्रथम क्रमांक कु.ऋतुजा राजेश बेलोस्कर अलिबागव्दितीय कु.नम्रता नारायण पाटीलपेणतृतीय क्र. कु. श्वेता संतोष कावजीखंडाळे -अलिबाग व चतुर्थ क्रमांक कु.सोनल विलास पाटीलउरण यांना मिळाला असून वरील चारही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

            या यशस्वी विद्यार्थ्यांचेप्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवाररायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डेउपाध्यक्ष आप्पा बाळ,रायगड जिल्हा ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाह जिजा घरतकोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष रामदास गायकवाडप्रमुख कार्यवाह प्रकाश पाटीलसार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयडोंगरे हॉल अलिबागचे अध्यक्ष अँड. गौतम पाटीलकार्याध्यक्ष तसेच जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा शैलाताई पाटील व जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शकग्रंथमित्र नागेश कुळकर्णी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

      या ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे व्यवस्थापक म्हणून सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी काम पाहिले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक