उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परिक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत

 

 

            रायगड,(जिमाका) दि.11:--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (.12वीपरिक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र (SARAL DATABASE) वरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थीसर्व शाखांचे पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थीनावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)चे विषय घेऊन प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परिक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेतही आवेदनपत्र www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुल्क प्रकार:- उच्च माध्यमिक  शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र,कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE  वरुन  ऑनलाईन पद्धतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा.  तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी,सर्व शाखांचे पुर्नपरिक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय  ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थीविद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

नियमित शुल्क :- सोमवार 09 ऑक्टोबर 2023 ते सोमवार 06 नोव्हेंबर- 2023,उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परिक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज(College Login) मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेला असेलकनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावीसदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावीत्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत प्राचार्य यांनी लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह व स्वाक्षरी करावी.12 वी परिक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावीसर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

दि.14 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहेसदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे नियमित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत याची नोंद घेण्यात यावी, असे सचिव राज्य मंडळ पुणे अनुराधा ओक यांनी  कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक