“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती

 

 

अलिबाग,दि.24(जिमाका):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक समता पर्व कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पेण बस स्थानकात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जागर समतेचा या पथनाट्यातून सामाजिक न्याय विभागाच्या अनूसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी, पद्दश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे, वृध्दाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात विनोद नाईक, सार्थक गायकवाड, तुषान मढवी, हर्षदा होगाडे, समृद्धी पाटील, नेहा पाटील, श्वेता खारकर,निशांत नवाखारकर आदी कलाकारांनी सहभाग घेतला.

या पथनाट्याचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले असून यावेळी या कार्यक्रमास पेण आगार व्यवस्थापक श्रीमती वर्तक, कार्यालय, अधीक्षक माधुरी पाटील, कनिष्ठ लिपिक राजेश्री म्हात्रे, समतादूत पेण अनुजा पाटील यांसह बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक