केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा-खासदार श्रीरंग बारणे

 

 

अलिबाग,दि.26(जिमाका):- केंद्र शासन व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित असते.  त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या जनतेच्या हितासाठी असलेल्या विविध लोकोपयोगी योजना जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांना कमीत कमी वेळेत त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. 

जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक (दि.25 एप्रिल 2023) रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

   यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, विभागीय उपवनसंरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे, विभागीय उपवनसंरक्षक (रोहा) अप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे प्रादेशिक प्रमुख, कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (जिल्हयातील एकूण नोंदणीकृत जॉब कार्डची संख्या-1 लाख 61 हजार 594, एकूण सक्रीय मजूर संख्या 44 हजार 68, सन 2022-23 मध्ये झालेला एकूण खर्च 1 हजार 193 लाख, एकूण सुरु असलेली कामे 360), प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-1 अंतर्गत जिल्ह्यात 325.721 किलोमीटर लांबीचे 89 रस्ते व 2 पुलांच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी 317.571 किलोमीटर लांबीचे 87 रस्ते व दोन पुलांचे काम पूर्ण, 4.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर), (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-2 अंतर्गत जिल्ह्यात 59.57 किलोमीटर लांबीच्या 9 रस्त्यांचे काम पूर्ण), (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-3 अंतर्गत जिल्ह्यात 126.96 किलोमीटर लांबीच्या 25 रस्त्यांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असून यापैकी 87.87 किलोमीटर लांबीच्या 17 रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे.), राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रम (या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण लाभार्थी 45 हजार 9), प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (महानगरपालिका, नगरपालिका) (या योजनेंतर्गत सन-2022 करिता एकूण उद्दिष्ट 37 हजार 130), स्वच्छ सर्वेक्षण 2022, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्ट 9 हजार 852, साध्य 9 हजार 378, सार्वजनिक शौचालय बांधकाम उद्दिष्ट 539, साध्य 340), जल जीवन मिशन (या योजनेंतर्गत वैयक्तिक नळजोडणी देण्यात आलेल्या घरांची संख्या 4 लाख 41 हजार 387 ),प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (एकूण 128 लाभार्थ्यांची प्रकरणांवर कार्यवाही सुरु), एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रम (जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयाकडील 16 लाख 56 हजार 257 पानांचे स्कॅनिंग पूर्ण, मूळ भूमापन नकाशांचे एकूण 13 प्रकारच्या नकाशा अभिलेखांच्या 2 लाख 14 हजार 791 शिटचे 22 लाख 5 हजार 155 पॉलिगॉनचे काम पूर्ण ), अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन  प्रधानमंत्री फसल बीमा योजना (भात व नाचणी) (सन-2022-23 मध्ये सहभागी शेतकरी 7 हजार 890, विमा संरक्षित क्षेत्र 2916.31 हेक्टर, विमा संरक्षित रक्कम 1501.47 लाख, शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम 30.03 लाख), पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (सन-2022-23 मध्ये सहभागी शेतकरी 7 हजार 509, विमा संरक्षित क्षेत्र 3588 हेक्टर, विमा संरक्षित रक्कम 4971 लाख, शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता रक्कम 1023.27 लाख), राष्ट्रीय आरोग्य योजना, समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मिड-डे मिल योजना (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) (या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र 3 हजार 89 शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी चे 1 लाख 10 हजार 51 विद्यार्थी  व इयत्ता 6 वी ते 8 वी चे 71 हजार 155 लाभार्थी लाभ घेत आहेत) , प्रधानमंत्री उज्वला योजना ( या योजनेंतर्गत एकूण लाभार्थी 65 हजार 152 असून मार्च 2023 अखेर उज्वला-2 मध्ये रायगड जिल्ह्याचा इष्टांक 4 हजार 181 लाभार्थ्यांचा होता व या सर्व लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन देण्यात आले.), जलमार्ग विकास कार्यक्रम (सागरमाला प्रकल्पांर्गत 1 काम पूर्ण, 5 कामे प्रगतीपथावर तर 2 कामे प्रस्तावित आहेत.), प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन-2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षात एकूण 867 प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्‍ट होते, 857 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले व 389 उमेदवार शिकाऊ कर्मचारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.), टेलिकॉम, रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, खाणी संबंधीची कामे, राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरण प्रकल्प, दीनदयाळ अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना , प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना( या योजनेंर्गत जिल्ह्यात जिल्ह्यात सन-2016-17 ते 2021-22 या वर्षात 9 हजार 833 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 9 हजार 827 प्रकरणे मंजूर झाली व 8 हजार 668 लाभार्थ्यांची उद्दिष्टपूर्ती झाली. 1 हजार 165 कामे प्रगतीपथावर आहेत.), सांसद आदर्श ग्राम योजना, डिजिटल इंडिया, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना या योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक