रोहा वन विभागातील म्हसळा येथे सागरी वन्यजीवाचा अवैध साठा जप्त

 

 

अलिबाग,दि.26(जिमाका):- उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत यांना दि.04 एप्रिल 2023 रोजी मौजे देवघर, ता.म्हसळा येथील सर्व्हे क्रमांक 1/3 येथे कॅपिझ शेल (Placenta Placenta ) या सागरी वन्यजीव प्राण्याच्या अवशेषांचा अवैध व्यापार चालू असल्याबाबतची  माहिती  मिळाली. त्यावरुन वनक्षेत्रपाल म्हसळा श्री.पांढरकामे, व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी तेथे  धाड टाकली असता घटनास्थळी RJ22 GB2387 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये मुद्देमाल प्लॅस्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता त्या ठिकाणी काही लोक समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत असताना आढळून आले.

 सागरी वन्यजीव वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सूची क्र. IV अन्वये प्रतिबंधित केलेला आहे. त्यामुळे घटनास्थळी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या श्री.मुरलीधर महादेव महामूणकर, श्री.धनंजय मारुती बनसोडे, श्री.रोहित अरविंद सादरे, श्री.गोपालसिंग पिरसिंज राजपूत, श्री.प्रेमदास श्रवणदास (रा.राजस्थान) यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,44,48, 48A, 50 (1) C 51 नुसार गुन्हा नोंद करून त्या  सर्वांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. घटनास्थळी एकूण 30 ते 35 टन मुद्देमाल आढळून आला. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पुढील अधिकचा तपास उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक श्री.विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक