“सामाजिक न्याय समता पर्व”अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अंधश्रध्दा निर्मूलन कायदा व व्यसनमुक्ती कायद्याबाबत जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न


 

अलिबाग,दि.26(जिमाका):- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व कार्यक्रमांतर्गत पोलीस मुख्यालय येथील जंजिरा हॉल येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अंधश्रध्दा निर्मूलन कायदा व व्यसनमुक्ती कायदा या विषयावरील कार्यशाळा दि.25 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावर सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ.यशवंत चावरे, अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर श्री.नितीन राऊत, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्य व्यसनमुक्ती जनजागृती या विषयासाठी नागोठणे एन.पी.जैन ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री.सुनिल देवरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन बाबत श्रीमती सुप्रिया जेधे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकद्वारे अंधश्रध्दा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व शासकीय अभियोक्ता ॲड.श्री.भूषण साळवी यांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त या कायद्यांतर्गत काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, सर्व गृहपाल व आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाज कल्याण कार्यालय अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक