महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.24(जिमाका):- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थांकडून/व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाचे संकेतस्थळ www.msbsde.gov.in वरुन प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड श्री.नि.के.चौधरी यांनी केले आहे.

प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवार सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा तसेच संबधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती दि.30 एप्रिल 2023 च्या पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी,
असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड श्री.नि.के.चौधरी यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक