जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 105.97 मि.मि.पावसाची नोंद




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 105.97 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1149.82 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 98.00 मि.मि., पेण-128.00 मि.मि., मुरुड-65.00 मि.मि., पनवेल-108.40 मि.मि., उरण-84.30 मि.मि., कर्जत-90.80 मि.मि., खालापूर-68.00 मि.मि., माणगांव-119.00 मि.मि., रोहा-129.00 मि.मि., सुधागड-106.00 मि.मि., तळा-126.00 मि.मि., महाड-102.00 मि.मि., पोलादपूर-132.00, म्हसळा-110.00 मि.मि., श्रीवर्धन-64.00 मि.मि., माथेरान-165.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1695.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 105.97 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 36.59% इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक