जिल्ह्यात 14 रोजी लोकअदालत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 14 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले या लोकअदालतीत ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत भारत दूर संचार निगम यांच्या पाणीबिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे , राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबत वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा  आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी  लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश रायगड अलिबाग तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक