मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5-   समाज कल्याण, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रवर्गाचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अर्ज तपासणीची शिबीरे आयोजित करण्यात आली होती. परंतु अद्यापही सन 2017-18 या वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून अप्राप्त आहेत.
तथापि अनु.जाती, इमाव, विजाभज, विमाप्र या प्रवर्गाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचे सन 2016-17 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज (Renewal Applications) व सन 2017-18 या वर्षातील सर्व नवीन अर्ज (Fresh/Ofline Applications) आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण रायगड-अलिबाग या कार्यालयाकडे 15 जुलै, 2018 पर्यंत सादर करावे. तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची तसेच प्राचार्यांची राहील, याची नोंद घ्यावी. तरी सन 2017-18 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक