डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6-  इयत्ता 11 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक  तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध संस्था, महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेणे अथवा स्वाधार योजनेचा लाभ घेणे असे पर्याय उपलब्ध असतील. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या , शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध  विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक  साहीत्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करण्यासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2018-19 मध्ये विविध महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या , पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक