माणगाव व पनवेल येथील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीराच्या तारखेत बदल

 

रायगड,दि.31(जिमाका):- किल्ले रायगडावर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा दि. 06 जून 2024 रोजी तारखेनुसार व दि. 20 जून 2024 रोजी तिथीनुसार साजरा होणार आहे. या सोहळयाकरिता किल्ले रायगड येथे दरवर्षीपेक्षा जास्त संख्येने शिवभक्त तसेच मान्यवर, अतिमहत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असून या कार्यक्रमासाठी येणारे अतिहत्वाच्या व्यक्ती व शिवभक्तांना तात्काळ परिपूर्ण वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दि.06 जून 2024  रोजी नियोजित दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर मंगळवार दि.11 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर दि.07 जून 2024  ऐवजी सोमवार दि.10 जून 2024  रोजी होईल, याची सर्व दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड