जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील 50 अधिकारी-कर्मचारी भुवनेश्वरला रवाना

 

अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका):-  ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे वतीने मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर या संस्थेत चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी बाबतचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.   

              रायगड जिल्ह्याने मागील काही वर्षात निसर्ग, तौक्ते अशा प्रकारची विविध वादळे व अतिवृष्टी, दरड कोसळणे यासारखी नैसर्गिक संकटे अनुभवली आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चक्रीवादळ  सौमिकरण व पूर्वतयारी अंतर्गत प्रशिक्षणाची असलेली गरज ओळखून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महसूल, पोलीस, ग्राम विकास विभागाच्या 50 अधिकारी/कर्मचाऱ्यांना दि. 15 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर, ओरिसा येथे चक्रीवादळ सौम्यीकरण व पूर्वतयारी या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहे.

             या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महसूल विभाग- 7, पोलीस विभाग- 10 पोलीस अधिकारी व 10 पोलीस कर्मचारी, 15 होमगार्डस् , श्रीवर्धन सरपंच 1,  घारापुरी उरण सरपंच 1, ग्रामविकास विभाग-6 असे एकूण 50  अधिकारी-कर्मचारी व इतर सहभागी झाले आहेत. यानंतरही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. कल्याणकर व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 50-50 च्या दोन पथकांना येणाऱ्या पुढील कालावधीत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा, आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचा समावेश केला जाणार आहे.  

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक