अनुसूचित जातीतील नवउदयोजकांनी स्टॅन्ड-अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  केंद्र शासनाने स्टॅन्ड-अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील नवउदयोजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती साठी असलेल्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउदयोजक यांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड- अप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.

 

या योजनेचा लाभ ज्या नवउदयोजकांना घ्यावयाचा आहे, त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक