कु.अनुराधा अनुसया या निराधार, अनाथ बालिकेच्या नातेवाईक/पालकांना जिल्हा महिला बाल विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

अलिबाग,जि.रायगड,दि.14 (जिमाका):- ता. पनवेल, (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने कु.अनुराधा अनुसया वय 16 वर्षे राहणार कळंबोली, ता.पनवेल या बालिकेस पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल, जि.रायगड या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. कु.अनुराधा अनुसया ही सध्या (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने स्वप्नालय मुलींचे बालगृह, पनवेल या संस्थेत दाखल आहे.

कु.अनुराधा अनुसया ही निराधार असून या बालिकेचे आई-वडील दोघेही रोड अॅक्सिडंटमध्ये मयत झालेले आहेत. रोड अॅक्सिडंट दरम्यान बालिका कळंबोली पोलिसांना मयत आई-वडीलांजवळ सापडली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कु.अनुराधाचे इतर कोणीही नातेवाईक नसल्याचे समजले त्यामुळे कळंबोली पोलिसांनी बालिकास काळजी व संरक्षणाची गरज असल्याने बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने पंचदिप संकुल बालग्राम, पनवेल या संस्थेत दाखल केले होते.

ही बालिका अनाथ असून (दि. 18 ऑगस्ट 2012) रोजी पासून आजतागत कोणीही नातेवाईक/ पालक भेटण्यास आलेले नाहीत. तरी या बालिकेचे नातेवाईक/पालक असल्यास त्यांनी अधीक्षक, पंचदिप संकुल बालग्राम, प्लॉट नं. 6, सेक्टर 12, सीकेटी, कॉलेज समोर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, जि.रायगड 410206 मो.नं. 7208085005 किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग दूरध्वनी क्र. 02141- 295321 येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी कळविले आहे.

00000  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड