नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रात (Dry Day) दारू बंदी लागू करणेबाबत

 

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2020-21 जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव व तळा या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.

या आदेशाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील पाली, म्हसळा, पोलादपूर, माणगाव, खालापूर व तळा या नगरपंचायतींच्या निवडणूकीच्या आधीच्या दिवशी, निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी निवडणूक कार्यक्षेत्रात मद्य विक्री न होण्याच्या दृष्टीने दारू बंदी (Dry Day) लागू करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

तरी, रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, माणगाव, खालापूर, पोलादपूर व म्हसळा या नगरपंचायतींच्या निवडणूक कार्यक्षेत्रात मद्य विक्री होणार नाही, यादृष्टीने निवडणुकीच्या आधीच्या दिवशी, निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी (Dry Days) दारुबंदी लागू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड