राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कशेळे ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

 


अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व एम.जी.एम.वैद्यकीय महाविद्यालय, कामोठे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवार दि.24 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 9 ते दुपारी 3.00 पर्यंत वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात सर्व प्रकारचे रोगनिदान करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये 1) भिषक (Physician) 2) शस्त्रक्रिया (Surgery) 3) बालरोग (Peadiatrician) 4) कान, नाक, घसा (ENT) 5)भूलतज्ञ (Anaesthestic) 6) स्त्रीरोगतज्ञ (Obst.& Gynac) 7) अस्थीरोग (Orthopaedic) 8) त्वचारोग (Skin & VD) 9) नेत्ररोग (Eye) 10) दंतचिकित्सा (Dental) अशा विविध वैद्यकीय तज्ञांमार्फत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची मधुमेह, हृदयविकार, दमा, वजन कमी होणे, सतत ताप येणे, सतत खोकला येणे, धाप लागणे, अंगावर गाठी येणे, हार्निया, हायड्रोसिल, अॅपेंडिक्स व इतर ऑपरेशन्स, अंगावरून पांढरे जाणे, अनियमित रक्तस्त्राव, कर्करोगाबाबत तपासणी (Papsmear), लहान मुलांचे आजार, नेत्र तपासणी, त्वचा रोग तपासणी तसेच दंतचिकित्सा, दात बसविणे, दात काढणे, दात स्वच्छ करणे व कवळी बसविणे इ. सर्व प्रकारच्या आजारांबाबत तपासणी करुन तज्ञांमार्फत चाचण्या, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

रुग्णांची नाव नोंदणी ग्रामीण रुग्णालय, कशेळे येथे दररोज सुरू आहे. रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाच्या 8669902392 या क्रमांकावर संपर्क साधून, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा http://bit.ly/Pt_reg या लिंकवरुन नोंदणी करावी. तसेच गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा व इतरांनाही सांगावे, जेणेकरून गरीब आदिवासी रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.खंदारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक