तृतीयपंथीयांनी नोंदणी करणे व ओळखपत्राकरिता समाज कल्याण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

 


अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका):-  जिल्हयातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

त्यानुसार तृतीय पंथीय यांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी www.transgender.dosje.gov.in या पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी.

तरी तृतीयपंथीय व्यक्ती यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक