साहसी पर्यटन उपक्रमाची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करावी-- पर्यटन उपसंचालक श्री.हनुमंत हेडे

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :-    महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देणे तसेच विविध साहसी उपक्रम आयोजक आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी नोंदणी, विनियमन, सनियंत्रण इत्यादी बाबत राज्य शासनाचे साहसी पर्यटन धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणानुसार जमिन, हवा आणि पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या संस्था यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या असून या धोरणानुसार जमीन, हवा, पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबवित असलेले, कार्यरत असलेल्या किंवा नवीन उपक्रम सुरु करण्याच्या संस्था, व्यक्ती, व्यक्ती समूह यांनी ही नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या  कोकण भवन, सीबीडी बेलापूर, येथील प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक श्री.हनुमंत हेडे यांनी केले आहे.

  पर्यटन संचालनालयाने साहसी पर्यटन उपक्रमांच्या नोंदणी करण्याची कार्यपध्दती सुरू केलेली असून www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर Menu Registration Forms Adventure Registration  यावर Click करून ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करता येणार आहे.  

कोकण विभागात जमीन, हवा पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या कार्यरत असणाऱ्या किंवा नवीन उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व संस्था/व्यक्ती यांना www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे (DoT) करण्यात यावी तसेच अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय (DoT) उपसंचालक पर्यटन, प्रादेशिक कार्यालय कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई किंवा पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन, 156/157, 15 वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई- 21 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभाग प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक