दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे दुचाकीसाठी नवीन मालिका MH-06-BZ सोमवार दि. 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.  मालिका सुरु होण्याची दिवशी अर्ज कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी अडीच पर्यंत स्विकारले जातील.  प्रथम तीनपट रक्कम भरणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल  एकाच दिवशी एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदरचा पसंती क्रमांक बंद लिफाफ्यात विनिर्दिष्ट केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष (Demand Draft) सादर केल्यानंतर जाहीररित्या जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्याला देण्यात येईल यांची नोंद घ्यावी.  पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची पध्दतीची माहिती कार्यालयीन सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक