दिव्यांग विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती प्रदान डीबीटीद्वारे



अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- शालांत परीक्षोत्तर  शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रदान हे  थेट बॅंक खात्यात (डीबीटी द्वारे) जमा होणार आहे. यासंदर्भात शासनाने शालांत परीक्षोत्त्तर  शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांक संलग्नित केलेल्या  बॅंक खात्यात  शिष्यवृत्ती व देय शैक्षणिक शुल्क अदा करतांना ते थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे असे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने  http://mahadbt.gov.in  या संकेतस्थळावर दि.30 नोव्हेंबर पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक