पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त उद्या कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन शुक्रवार दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने सन 2018-19 हे वर्ष राश्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष घोषित केले आहे. ज्वारी, बाजरी, रागी व अन्य लघु अन्नधान्ये या पिकांना त्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेता  पौष्टीक अन्नधान्य कार्यक्रमात रागी (नाचणी) या पिकासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी उत्पादक गट, , कृषि प्रक्रिया उद्योग उभार्णी, पौष्टिक अन्नधान्य  मूल्यवृद्धीसाठी उत्प्दन निर्मिती साखळी तयार करणे, जनजागृती करणे अशा  विविध बाबींचा समावेश आहे. त्यादृष्टीने जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात शुक्रवार दि.16 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे, या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक