दिव्यांगांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी : उपचारांसाठी जिल्हा परिषद देणार अर्थसहाय्य



अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषदेने विविध अपंगत्वावर केले जाणारे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपंक्चर थेरपी याउपचारांसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा परिषद आपल्या स्व उत्पन्नाचा 5 टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखून खर्च करीत असते. दिव्यांग व्यक्तिंना गरजेनुसार फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, स्पीच थेरपी आदी उपचार करणे आवश्यक असते. मात्र या उपचारांचा खर्च  अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना परवडणारा नसतो. म्हणून या उपचारांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यासाठी ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असलेल्या व अशा उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना हे अर्थसहाय्य दिले जाईल. त्यासाठी  समाजकल्याण विभागात दूरध्वनी 02141-222079 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक