राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 या वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


नवी मुंबई, दि. 16  :  राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे,
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 जाहिरात नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.  राज्य सेवा परीक्षा 2019 जाहिरात डिसेंबर  2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 13,14 व 15 जुलै 2019 रोजी होणार आहे.   महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 24 मार्च 2019 रोजी होणार आहे.   महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -1  मुख्य परीक्षा दिनांक 28 जुलै 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक 04 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे.  महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 राज्य कर निरीक्षक  मुख्य परीक्षा दिनांक 11ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 सहायक कक्ष अधिकारी  मुख्य परीक्षा दिनांक 25ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2019 जाहिरात जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 31 मार्च 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 07 जुलै 2019 रोजी होणार आहे.  
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2019 जाहिरात फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 07 एप्रिल 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे.  
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2019 जाहिरात फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 01 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे.
  महाराष्ट्र कृषि सेवा  परीक्षा 2019 जाहिरात मार्च  2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 19 मे 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 29 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे.
महाराष्ट्र वन सेवा  परीक्षा 2019 जाहिरात मार्च  2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 26 मे 2019 रोजी होणार आहे.  मुख्य परीक्षा दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे.
महाराष्ट्र गट-क  सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात एप्रिल  2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 16 जून 2019 रोजी होणार आहे.   महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2019 संयुक्त पेपर क्रमांक-1  मुख्य परीक्षा दिनांक 06 ऑक्टोबर  2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2019   पेपर क्रमांक-2 लिपिक –टंकलेखक  मुख्य परीक्षा दिनांक 13 ऑक्टोबर  2019 रोजी होणार आहे.  महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2019  पेपर क्रमांक-2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क  मुख्य परीक्षा दिनांक 20 ऑक्टोबर  2019 रोजी होणार आहे.  महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2019  पेपर क्रमांक-2 कर सहायक,    मुख्य परीक्षा दिनांक 3 नोव्हेंबर  2019 रोजी होणार आहे. 
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात एप्रिल  2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 23 जून 2019 रोजी होणार आहे.   महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 मुख्य परीक्षा दिनांक 02 नोव्हेंबर  2019 रोजी होणार आहे.  महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 मुख्य परीक्षा दिनांक 09 नोव्हेंबर  2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 मुख्य परीक्षा दिनांक 24 नोव्हेंबर  2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -2019 मुख्य परीक्षा दिनांक 24 नोव्हेंबर  2019 रोजी होणार आहे.
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2019 जाहिरात मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   मुख्य परीक्षा दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2019 जाहिरात मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे   मुख्य परीक्षा दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट –ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2019 जाहिरात मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे   मुख्य परीक्षा दिनांक 15 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. असे उपसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक