पत्रपरिषदः गेल्या चार महिन्यात 3 कोटी 98 लाख रुपयांच्या धान्य व केरोसिनची बचत- जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे


                        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- राज्यात End to End  Computerization प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकीकरण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस  मशीन बसविण्यांत आल्या असून त्याद्वारे पात्र लाभर्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून शिधा वस्तूंचे वितरण करण्यांत  येत आहे. या मुळे वितरण व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असून वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक होत आहे. रायगड जिल्ह्यात या बदलामुळे गेल्या चार महिन्यात 6057.2 मेट्रिक टन धान्याची  व 3 लाख 62 हजार लिटर केरोसिनची बचत झाली आहे. त्यामुळे तब्बल 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे यांनी दिली.
पुरवठा शाखेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व त्यामुळे झालेल्या बदलांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
आधार संलग्न वितरण
यावेळी ते म्हणाले की, रास्त भाव धान्य दुकानांत Aadhar enabled Public Distribution System (AePDS) प्रणाली सुरु करण्यात आली असून या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे दुकानदार Ae-PDS ची अंमलबजावणी करीत नाहीत त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यांत आलेली आहे. त्यापैकी 4 रास्त भाव धान्य दुकानांचे निलंबन करण्यांत आले असून 20 रास्त भाव धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी उपाययोजना
1) रास्त भाव दुकानांतील ई-पॉस मशीनद्वारे कुटूंबातील कोणत्याही एका सदस्याचे Aadhar Authentication करुन धान्य वितरण केले जाते.
2) Aadhar Authentication नाही झाले तर eKYC (e-Know Your Customer) करुन धान्य वितरण केले जाते.
3) वरील तीन पर्याय शक्य नसल्यास Route Nominee यांच्या Aadhar Authentication च्या आधारे संबधितांना धान्य वितरण करण्यात येते.
4) रायगड जिल्हयात एकुण 1358  रास्तभाव दुकाने आहेत. व त्यांना पॉस मशीन देण्यात आलेल्या आहे. व सर्व तालुक्यात पॉस मशीनद्वारे धान्य वाटप सरु आहे.
5) "No Network FPS" रास्त भाव दुकानांमधून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत Nominee चा वापर करुन धान्य वितरण करण्यात येत आहे.
धान्य वितरणात रायगडचा राज्यात चौथा क्रमांक
या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता येऊन सर्व लाभार्थ्यांना नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळण्याची हमी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात 1358 ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या असून त्याद्वारे माहे सप्टेंबर 2018 मध्ये 91.33% धान्य वितरण करुन रायगड जिल्ह्याने राज्यामध्ये ई-पॉसद्वारे धान्य वितरणामध्ये चौथा क्रमांक मिळविलेला आहे. तसेच माहे ऑक्टोबर 2018 मध्ये 91.22% धान्य वितरण करण्यात आलेले आहे.
डाळ साखर यांची नियमित उपलब्धता
                        लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रतिकिलो 35/- रु. या दराने प्रतिमाह प्रती शिधापत्रिका 1 किलो तुरडाळ तसेच एकुण 2 किलो डाळी (चणाडाळ 1 किलो 35/- रु व 44/-रु प्रती किलो या दराने उडीदडाळ 1 किलो) या कमाल मर्यादेत वितरीत करण्याचा शासन निर्णयाच्या अनुषंगाने माहे नोव्हेंबर 18 करीता 3297.42 क्विंटल तुरडाळ मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे 1870 क्विंटल चणाडाळ व 940 क्विंटल उडीदडाळीचे नियतन मंजूर झाले आहे. अंत्योदय योजनेच्या प्रत्येक कार्ड धारकास 1 किलो प्रती कार्ड प्रमाणे साखर वितरीत करण्यात येते. त्याचा दर 20/- प्रती किलोप्रमाणे आहे. तसेच, माहे नोव्हेंबर, 2018 मध्ये दिवाळी निमित्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याकरीता सुध्दा प्रती कार्ड 1 किलो प्रमाणे रु. 20/- दराने  साखर वितरण सुरु आहे.
केरोसिन वितरणात पारदर्शकता
            सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसीन वितरणात पारदर्शकता यावी व केरोसीन पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचावे यासाठी केरोसीन वितरण POS (Point Of Sale) द्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्याची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यामध्ये सुरु असून 415 दुकानांमधून वितरण होते. पात्र लाभार्थ्यांना  1 व्यक्ती कुटूंबासाठी 2 लि., 2 व्यक्ती कुटूंबासाठी 3 लि.,  3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्ती कुटूंबासाठी 4 लि.  प्रती लिटर किमान दर 27.80 पै. व  कमाल दर  29.13 पै. याप्रमाणे वितरण करण्यात येते.
                        सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राप्त होणारे अनुदानित दराचे केरोसीन केवळ बिगर गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना अनुज्ञेय आहे. गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना अनुदानित दराच्या केरोसीनमधून गॅस स्टॅम्पींगची  मोहिम राबविण्यात आली. तसेच केरोसीनच्या लाभार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यात आली. त्यानुसार केरोसीनचे वाटप सुरु आहे. कोणताही गॅस जोडणीधारक अनुदानित केरोसीनचा लाभ घेतांना आढळल्यास त्याच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच भारतीय दंड संहितेतील तरतूदींनुसार तो लाभार्थी कारवाईस पात्र आहे. शासन परिपत्रक 26 सप्टेंबर, 2016 अन्वये समांतर केरोसिन बाजार व्यवस्थेअंतर्गत फ्री -सेल केरोसिनचा पुरवठा, वितरण, खरेदी-विक्री या बाबी शासनाने नियंत्रण मुक्त केलेल्या आहेत. तसेच आता संमातर केरोसिन बाजार व्यवस्थेअंतर्गत नियुक्त केलेल्या फ्री-सेल केरोसिन घाक विक्रेते व फेरविक्रेत्यांना फ्री-सेल केरोसिनचा पुरवठा, वितरण व विक्री या बाबींकरीता या विभागाकडून परवाना घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी कंपनी (OMC) कडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
3 कोटी 98 लाख रुपयांची गेल्या चार महिन्यात बचत

                      सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये ई-पॉस मशीनच्या वापरामुळे रायगड जिल्ह्यामध्ये माहे जुलै, 2018 ते ऑक्टोबर, 2018 पर्यत 6057 मे.टन धान्याची व साधारपणे र.रु.1,81,00,000 /- इतक्या रकमेची बचत झालेली आहे. तसेच माहे ऑगस्ट, 2018 ते नोव्हेंबर, 2018 पर्यत केरोसीन  वितरणामध्ये 362 के.लि.  केरोसीन व साधारणपणे र.रु.2,17,20,000/- इतक्या रकमेची  अशी एकूण 3 कोटी  98 लाख 20 हजार रुपयांची बचत झाली आहे,असे दुफारे यांनी सांगितले
टोल फ्री क्रमांक सुविधा
                        पात्र लाभार्थ्यांना लाभ प्राप्त करुन घेण्याबाबत कोणतीही अडचण आल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण प्रणाली अंतर्गत आपली तक्रार टोल फ्री क्रमांक 1800 22 4950/1967 या क्रमांकावर करण्याची विनामुल्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर सार्वजनिक  वितरण व्यवस्थेची संपूर्ण  माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी दुफारे यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक