जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव आजपासून तळा येथे


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- जिल्हा विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सव 2017-18 चे आयोजन  गुरुवार दि.4 ते शनिवार दि. 6  या कालावधीत तळा येथे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड-अलिबाग व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज तळा जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.
 ग्रंथदिंडीने शुभारंभ
 गुरुवार दि.4 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन  तळा नगरपंचायत येथून ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. यावेळी तळा पंचायत समितीचे सभापती  रविंद्र नटेव डॉ. नंदिनी देशमुख यांचीही उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन सत्र
विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोस्तवाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ. सुनिल तटकरे व आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता कार्यक्रमस्थळी होईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे या उपस्थित राहतील. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अनिल तटकरे,  आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील तसेच विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, आ. धैर्यशील पाटील, आ. सुभाष पाटील, आ. अवधूत तटकरे, मनोहर भोईर, भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  समाजकल्याण सभापती नारायण डामसे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती उमा मुंढे, कृषि, दुग्ध व पशुसंवर्धन समिती  सभापती  दत्तात्रेय पाटील,  जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे,  जि.प.सदस्या  गिता जाधव, बबन वाचले, तळा पंचायत समिती सभापती रविंद्र नटे, तळा नगराध्यक्ष श्रीमती रेश्मा मुंढे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर धामणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
            ग्रंथोत्सवातील कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.4 रोजी-
निंबध स्पर्धा- दुपारी 2.30 ते 3, गट- 5 वी ते 8 वी, विषय- मानवी आरोग्य व स्वच्छता. गट- 9 वी ते 12 वी, विषय- स्त्री-पुरुष समानता.
काव्य वाचन स्पर्धा- वेळ दुपारी 2.30 ते 3, गट- 9 वी ते 12 वी, दुपारी 3 ते 3.30 वाजता- गट 5 वी ते 8 वी.
वादविवाद स्पर्धा- गट 5 वी ते 8 वी, विषय-दूरचित्रवाणी शाप की वरद- 9 वी ते 12 वी, विषय- आजची महिला सबला कि अबला.
व्याख्यान- वेळ- दुपारी 3 ते 4,  वक्ते- डॉ.विनय देशमुख, निवृत्त प्रधान वैज्ञानिक CMFRI मुंबई, सदस्य महाराष्ट्र जैव विविधता मंडळ नागपूर सल्लागार जे.एस.पी.टी. विषय-पर्यावरण व जैव विविधता
दुपारी 4 ते 5वक्ते- संतोष टकले, वरीष्ठ वैज्ञानिक, भाभा अनुसंधान केंद्र मुंबई, विषय-आपले तारांगण.
सायं. 7 ते 9 सांस्कृतिक कार्यक्रम (स्पर्धा) उद्घाटक मंगेश देशमुख.
शुक्रवार दि. 5 रोजी-
व्याख्यान- वेळ- सकाळी 11 ते 12, वक्ते- डॉ.प्राचार्य मच्छिद्रनाथ मुंडे, विषयःवैज्ञानिक चमत्कार
वेळ- 12 ते 1, वक्ते- डॉ.नंदिनी देशमुख, विषय- हवामान बदल व शाश्वत विकास
कविसंमेलन- वेळ दुपारी 1 ते 3, अध्यक्ष डॉ.नंदीनी देशमुख, पुरुषोत्तम मुळे, डॉ. एन.एस.यादव, डी.टी आंबेगावे., हेमंत वारटक्के, वसंत कासरे, एस.ए. हज्जु, एस.एन. शरमकर, डॉ.व्ही.एन. लोखंडे, जामकर
परिसंवाद वेळ दुपारी 3 ते 5 वाजता, विषय- विज्ञान व तंत्रज्ञानाचे बदलते स्वरुप व समाज, अध्यक्ष श्रीप्रकाश अधिकारी, विषय तज्ज्ञ संदेश कुळकर्णी, डॉ.श्रीकृष्ण तुषारे, डॉ.नागोरे, पा.शेळके विलास, सौ.निलीमा काप, डॉ.वसंत डोंगरे, डॉ.भगवान लोखंडे, (निवेदन)
चित्रफीत- सायं. 6 ते 7, विषय- एव्हरेस्ट चढाई, सादरकर्ते व्हि.जे. रेणुकर
स्थानिक कलाकारांचे कला दर्शन स्पर्धा-सायं.  7 ते 9
शनिवार दि. 6 रोजी-
प्रश्नमंजूषा, वेळ- सकाळी 9 ते 11वा, गट-माध्यमिक
वक्तृत्व स्पर्धा- वेळ- सकाळी 9 ते 11 वा. गट- 5 वी ते 8 वी,  विषय- माझा आवडता नेता.
गट 9 ते 12 वी, विषय- प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना.
पारितोषिक वितरण व समारोप- या समारंभाचे पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई ठाकरे, उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांची उपस्थित राहणार असून यावेळी सुधाकर घारे, बाजीराव परदेशी, श्रीमती सुश्रृता पाटील, प्रभाकर म्हात्रे, श्रीमती आरती मोरे, श्रीमती उज्ज्वला सावंत,  मोतीराम ठोंबरे, श्रीमती रेश्मा शेळके, जितेंद्र सावंत, चंद्रकांत रोडे, गणेश वाघमारे, मंगेश देशमुख, बी.बी. सप्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  
या तीन दिवसीय सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुरेश आवारी, जिल्हा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) शेषराव बढे,  गटविकास अधिकारी पं.स.तळा व्ही.व्ही. यादव, गट शिक्षणाधिकारी तळा एस.आर. सोंडकर,  जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक ज्ञानेश्वर हरकळ, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डी.एस. ठोंबरे, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष एस.पी. चव्हाण, वेदक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बी.झेड. धुमाळ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक