शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना : पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ



             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती  योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांची उत्पन्न मर्यादा ही सहा लाख रुपये इतकी होती ती आता शासनाने आठ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. नुकतेच दि,1 जानेवारी 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
 यासंदर्भात  शासन निर्णय इबीसी-2017/ प्र.क्र.27/शिक्षण दि.1 जानेवारी 2018 मध्ये देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनानुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि शासकीय विद्यापीठात  विनानुदान तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी  प्रवेश घेतलेल्या  विमुक्त जक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न  मर्यादा ही 6 लक्ष रुपयांवरुन 8 लक्ष करण्यात आली आहे. ही सुधारीत उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अन्य अटी व शर्ती या पुर्वीप्रमाणेच( दि.31 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार आहेत. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंधळपाडा ता. अलिबाग जि. रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक