ओबीसी महामंडळ कर्जवसूलीसाठी दोन टक्के व्याज सवलत


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत (ओबीसी महामंडळ) विविध लाभार्थ्यांना देण्यात आलेले कर्ज वसूलीसाठी महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. येत्या 31 मार्च अखेर थकित मुद्दल व व्याज एकरकमी भरल्यास थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार, असल्याचे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा व्यवस्थापक एन. व्ही नार्वेकर यांनी कळविले आहे.
यासंदर्भात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त्‍ आणि विकास महामंडळ  मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, रायगड या कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील वितरीत कर्जाची एकूण थकीत रक्कम 37.94 लक्ष रुपये इतकी आहे. कर्जवसूलीसाठी थकीत लाभार्थी, त्यांचे जामिनदार, हमीपत्र,पगारपत्र धारकाचे वेतनातून कपात,गहाणखत (कर्जबोजा नोंद उतारे) इत्यादींच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले,महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील तरतूदीनुसार आर.आर.सी. इत्यादी अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
            महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशीर कार्यवाही करण्याचे कामकाज सुरु झाले आहे. तरी रायगड जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थींनी दि.31 मार्च 2018 पर्यंत एकरकमी भरणा केल्यास थकीत व्याज रक्कमेवर 2% सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा. थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरणा करुन कर्ज खाते बंद करुन,कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन.व्ही.नार्वेकर, यांनी केले आहे.

000००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक