कोविड-19 लसीकरण मोहीम व आरटीपीसीआर कोविड-19 चाचण्यांबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आढावा बैठक संपन्न

 


अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील एमआयडीसी व इतर भागातील औद्योगिक आस्थापनांची कोविड-19 लसीकरण मोहीम व आरटीपीसीआर कोविड-19 चाचण्यांबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली (दि.15 जुलै) रोजी ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली.

             यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगड चे सहसंचालक श्री. एम.आर. पाटील, कामगार आयुक्त पनवेल, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र रायगड, सर्व उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, काळ प्रकल्प माणगाव तथा समन्वय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी व 80 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

              यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडे एकूण 3 हजार कंपन्यांचे 54 हजार 700 मनुष्यबळ व औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडे एकूण 1 हजार 427 कंपन्यांच्या 1 लाख 30 हजार मनुष्यबळासह  एकूण 4 हजार 427 उद्योगांमध्ये 1 लाख 84 हजार 700 मनुष्यबळासह या कंपन्या नोंदणीकृत आहेत.

              जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांकडील संघटित कर्मचारी/कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या तसेच राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.  त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये देशाचे व राज्याचे अर्थचक्र विनाअडथळा सुरू राहण्यासाठी कोविडबाबतच्या योग्य वर्तनाच्या पालनाची आवश्यकता असून त्यासाठी शासनाकडून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

            तसेच औद्योगिक आस्थापनांमधील संघटित व असंघटित कर्मचारी/कामगारांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी कोविड-19 च्या आरटीपीसीआर चाचण्या दर पंधरा दिवसाला करण्याचे व लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश सर्व असोसिएशन व कपंनी व्यवस्थापनांना दिले. तसेच कंपन्यांकडील सामाजिक दायित्व निधी (CSR) मधून गावे दत्तक घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना लस उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा.  जिल्ह्यात जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोविड-19 मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणे शक्य होईल. औद्योगिक आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान कर्मचारी /कामगारांची संख्या मोठी असल्याने कोविड-19 च्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. कोविड-19 बाधित कामगारांचे उपचाराच्या नियोजनाबाबत जबाबदारीपूर्वक कार्य करावे, जेणेकरून कोविड-19 च्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेदरम्यान रायगड जिल्ह्यातील उद्योग-व्यवसाय सुरळीतपणे सुरू राहतील, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक