"राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा" दि.28 ऑगस्ट रोजी

 


अलिबाग, जि.रायगड, दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा दि.05 जून 2021 रोजी होणार होती. परंतु एप्रिल व मे 2021 महिन्यातील देशातील व राज्यातील कोविड-19चा प्रादूर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय.एम.सी.डेहराडून यांनी दि.05 जून 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय घेतला होता.

     सध्याची देशातील व राज्यातील कोविड-19 चा प्रादूर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय.एम.सी. डेहराडून यांनी "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा- जून 2021"  ही दि.28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्याचे कळविले आहे.

    या परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-

दि.28  ऑगस्ट 2021 गणित विषय सकाळी 9.30 ते 11.00 वा., सामान्य ज्ञान दुपारी 12.00 ते 1.00 वा. इंग्रजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 वा.

    तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे चे आयुक्त श्री.तुकाराम तुपे यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक