पोस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून 2 लाख KF94 मास्क जिल्हा प्रशासनास सुपूर्द

 



 

अलिबाग,जि.रायगड, दि.13,(जिमाका):- येथील माणगाव तालुक्यातील पॉस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इतर घटकांकरिता 2 लाख मास्क आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

      यावेळी पॉस्को कंपनीचे संचालक व्यवस्थापक नाम हैंग हिओ, मॅनेजर सुधीर भोसले, जनरल मॅनेजर कांग हि चोई, डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील उपस्थित होते.

            करोना संकटावर मात करण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेले हे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतर कंपन्या व सामाजिक संस्था यांनीदेखील आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पोस्को कंपनीने केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोस्को कंपनीचे आभार मानले. यापूर्वीही पोस्को कंपनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाराष्ट्रातील अनेक प्रसंगात अनेकांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून गेली आहे.

             जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार पॉस्को कंपनीकडून देण्यात आलेल्या KF 94 या 2 लाख मास्कपैकी जिल्हाधिकारी कार्यालय 1 लाख, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय 30 हजार तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व इतर घटकांकरीता 70 हजार  KF 94 मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक