स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण
रायगड,दि.13 (जिमाका):- भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9.05 वा.संपन्न होणार आहे.
तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment