एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी व्हा
रायगड दि.23(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतक-यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबीचा समावेश आहे. जिल्हयामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.
फुले लागवड-कट फ्लॉवर्स (गुलाब, अॅस्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनियास, गोल्डन रॉड, शेवंती इ.) खर्च मर्यादा 1 लाख 25 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 50 हजार रुपये प्रती हेक्टर.
कंदवर्गीय फुले (निशिगंध, ग्लॅडीओलस, लिलियम, लिलिज, कॅलालिली, डेलिया इ.) खर्च मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 1 लाख रुपये प्रती हेक्टर.
सुटी फुले (झेंडू, अॅस्टर, गेलाडिया, हेलिक्रायसम, शेवंती, मोगरा, जाई, जुई, झिनिया, बिजली इ.) खर्च मर्यादा 50 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 20 हजार रुपये प्रती हेक्टर.
मसाला पीक लागवड- बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिके (मिरची, हळद व आले) खर्च मर्यादा 50 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 20 हजार रुपये प्रती हेक्टर.
बहुवर्षिय मसाला पिके (काळीमिरी, कोकम इ.) खर्च मर्यादा 1 लाख रुपये प्रती हेक्टर. अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 40 हजार रुपये प्रती हेक्टर.
विदेशी फळपीक लागवड- ड्रॅगनफ्रूट खर्च मर्यादा 6 लाख 75 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 2 लाख 70 हजार रुपये प्रती हेक्टर.
स्ट्रॉबेरी खर्च मर्यादा 2 लाख रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 80 हजार रुपये प्रती हेक्टर.
अवॅकॅडो खर्च मर्यादा 1 लाख 25 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल 50 हजार रुपये प्रती हेक्टर.
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन- जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन खर्च मर्यादा 60 हजार रुपये प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 24 हजार रुपये प्रती हेक्टर.
अळिंबी- अळिंबी उत्पादन प्रकल्प खर्च मर्यादा 30 लाख प्रती युनिट, अनुदान मर्यादा खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 12 लाख रुपये प्रती युनिट.
अळिंबी बीज उत्पादन केंद्र खर्च मर्यादा 20 लाख प्रती हेक्टर, अनुदान मर्यादा खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 12 लाख रुपये प्रती युनिट.
बटन अळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्प खर्च मर्यादा 30 लाख प्रती युनिट, अनुदान मर्यादा खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 12 लाख रुपये प्रती युनिट.
कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्र 2 लाख प्रती युनिट, अनुदान मर्यादा खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 1 लाख रुपये प्रती युनिट.
०००००
Comments
Post a Comment