जिल्हा माहिती कार्यालयातील श्री.हिरामण भोईर यांना स्नेहपूर्ण निरोप






            अलिबाग, दि.31 : जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबागचे वरिष्ठ लिपिक श्री. हिराम भोईर हे नियत वयोमानानुसार  दि. 31 मे 2018 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने  त्यांना कोंकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला. डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती) यांच्या हस्ते श्री.भोईर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
            डॉ.गणेश मुळे यांनी श्री.भोईर यांच्या सेवेचे कौतूक करून त्यांना भावी  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
            श्री. भोईर यांनी आपल्या मनोगतात सेवा काळातील आठवणी सांगून सर्व सहका-यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी सहायक संचालक दत्तात्रेय कोकरे, कर्मचारी सर्वश्री लघुलेखक श्रीमती वनिता कांबळे, लेखापाल गंगाराम बांगरा, वरिष्ठ लिपिक श्री. राजेंद्र मोहिते, लेखा लिपिक श्रीमती राजेश्री वाडेकर, लिपिक टंकलेखक श्री. प्रशांत गावंड,  दूरदर्शन कॅमेरामन श्री. अरुण जाधव, श्री. सचिन पाटील, श्री. वैभव मेहर, श्री. प्रेम शुक्ला, श्री. जितेंद्र यादव,  श्री. संजय कोळी, श्री. प्रल्हाद अभंग, श्री. संदिप गोवळकर तसेच शुक्ला व भोईर कुटुंबिय उपस्थित होते.    
000 000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक