शिक्षक मतदारांना 30 जानेवारी रोजी विशेष नैमित्तीक रजा मंजूर

 

 

            अलिबाग,दि.12(जिमाका):- कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी   दि. 30 जानेवारी,  2023 रोजी शिक्षक मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक  मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक