नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि.14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

 

 

अलिबाग,दि.12(जिमाका):- नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचा गट, शेळी गट, एक दिवसाची सुधारित जातीच्या कोंबडीची  पिले वाटप, मांसल कुकूट पक्षांसाठी 1 हजार फूट शेड या विविध योजनांचे (50टक्के-75टक्के अनुदान) ऑनलाईन अर्ज करण्याची  दि.14 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, दि.13 डिसेंबर 2022 ते दि.14 जानेवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 33 दिवस, डाटा बॅकअप करणे, दि.15 व दि.16 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 2 दिवस, रॅंडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, दि.17  ते  दि.21 जानेवारी 2023 पर्यंत  एकूण दिवस/कालावधी 5 दिवस, राखीव, दि.22 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.23  ते  दि.30 जानेवारी 2023 पर्यंत  एकूण दिवस/कालावधी 8 दिवस, राखीव, दि.31 जानेवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस,

पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, दि.1  ते  दि.8 फेब्रुवारी 2023 पर्यंत  एकूण दिवस/कालावधी 8 दिवस, राखीव, दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रूटी पूर्तता, दि.10  व  दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 2 दिवस, कागदपत्रे अंतिम पडताळणी,  दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, राखीव, दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी  एकूण दिवस/कालावधी 1 दिवस.

तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.रत्नाकर काळे व  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्यामराव कदम यांनी केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक