जागतिक आरोग्य संघटना व इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च संस्थाच्या पुढाकारातून महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथे “जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण” विषयावरील चर्चासत्र संपन्न

 


अलिबाग,दि.09(जिमाका):- रायगड जिल्ह्याचे सब नॅशनल सर्टिफिकेट ( SNC ) करिता नामांकन झाले असून त्यासाठी दहा तालुक्यातील स्वयंसेवकांद्वारे याचे सर्व्हेक्षण गेल्या महिन्यापासून सुरू झालेले आहे. हा सर्व्हे जागतिक आरोग्य संघटना ( WHO )  इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च ( ICMR ) या जागतिक दर्जाच्या रिसर्च संस्थाच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. हे सर्व्हेक्षण जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण किती प्रमाणात कमी झाले आहे, हे जाणून घेण्यासाठी करण्यात येत आहे. यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील खारघर मधील पेंधर, कर्जत, खोपोली, पाली या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी खाजगी मेडिकल, खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर, बरे झालेल्या क्षयरुग्णांना गृहभेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली आहे. 

तसेच या कार्यक्रमाचा एक नियोजित भाग म्हणून पनवेल येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथे दि.4 जानेवारी 2023 रोजी नामीनल टेक्निकल ग्रुप (NGT) यांच्याकडून गुणवत्तादर्शक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अँटी टी.बी.ड्रग विकणारे होलसेल डीलर, किरकोळ विक्रते व सहभागी झालेल्या तज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारून व दिलेल्या प्रश्नावलीत सांगितल्याप्रमाणे माहिती भरून तो फॉर्म नोडल अधिकारी यांना द्यायचे होते. अशा पध्दतीने पनवेलमधील जवळपास 70 जणांच्या यात सहभाग नोंदविला होता. यात डॉक्टर, होलसेल डीलर, व किरकोळ औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी या कार्यक्रमात त्यांचे मत जाणून घेण्यात आले.  तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

यावेळी आय.ए.पी.एस.एम. चे प्रतिनिधी म्हणून नोडल अधिकारी प्रा.डॉ. प्रसाद वाईंगणकर, मेजर डॉ.आश्लेषा तावडे- केळकर,  प्रा.डॉ.सुनिता सुनीला, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार (WHO) चे प्रतिनिधी म्हणून डॉ.अविनाश जाधव, औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्री.शेख,  औषध निरीक्षक श्रीमती यादव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष डॉ.गिरीश गुणे, बालरोगतज्ञ डॉ.महेश मोहिते, रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रवीण नावंदर, पनवेल केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.नितीन गावंड, उलवे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमती सीमा पाटील तसेच होलसेल डीलर श्री.विवेक शिंदे, श्री.सुशील माळी, श्री.मिलन ठक्कर, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे डॉ.सुरेश ठोकळ, जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री. सतिश दंतराव, डॉट्स प्लस पर्यवेक्षक श्री.मनोज बामणे, पनवेल महानगरपालिकेचे डॉ.नितीन पाटील,डॉ. रिहाना मुजावर तसेच श्री.समीर वाशिकर, श्री.जितेश चव्हाण, श्री.श्रेयस चावरे, श्री.समाधान धनवे, श्रीमती. मनीषा पुंडे, श्रीमती मिताश्री चांगे आदी कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक