इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कृती कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन

 

अलिबाग,दि.12(जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत 9 विभागीय मंडळमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) या दोन सार्वत्रिक परीक्षाचे आयोजन करण्यात येते. परीक्षेच्या कालावधीत विविध मार्गांनी निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील 9 विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. तथापि या प्रयत्नात एकसूत्रिपणा असण्याची गरज सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्व समावेशक असा कृती कार्यक्रम तयार करण्याचे मंडळाने ठरविले आहे.

यासंदर्भात परीक्षेशी संबंधित सर्व घटकांच्या (विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजमाध्यम) इत्यादींच्याकडून परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण कृतीकार्यक्रम मागविण्यात येत आहेत.  याकरिता मंडळाने गुगल फॉर्म तयार केला आहे. या गुगल फॉर्मची https://forms.gle/y/Tsy21P93W8d4f0AA ही लिंक असून ती मडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 या कृती कार्यक्रमांचे परीक्षण पुढील निकषांनुसार केले जाईल :-नाविण्यपूर्ण व उपयुक्त व्यावहारीक कृतीकार्यक्रम, कमी खर्चिक, कमी मनुष्यबळाची आवश्यकता असलेला कृतीकार्यक्रम, सर्वत्र राबविण्यास उपयुक्त असा कृतीकार्यक्रम, सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणेचाच वापर करून अंमलबजावणीकरिता येण्यासारखा कृती कार्यक्रम, कमी वेळेत अंमलबजावणीकरिता येणारा कृतिकार्यक्रम.

या कृती कार्यक्रमासाठी https://forms.gle/y/Tsy21P93W8d4f0AA या लिंकवर आपला कृतीकार्यक्रम विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीन कळवावयाचा आहे. या लिंकवरील प्राप्त कृती कार्यक्रमाचे मूल्यमापन करून यापैकी दहा उत्कृष्ट निवडक कृती कार्यक्रमांची तज्ञ समितीमार्फत निवड करून कृती कार्यक्रम पाठविणाऱ्यांचा मंडळामार्फत यथोचित गौरव करण्यात येईल.  तज्ञ समितीचा निर्णय अंतिम असेल.  हे कृती कार्यक्रम पाठविण्याचा कालावधी बुधवार, दि.11 जानेवारी ते शुक्रवार, दि.20 जानेवारी 2023 असा राहील, असे सचिव, राज्यमंडळ, पुणे अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक