दत्तात्रेय विठठल तांडेल व चिखले ग्रामस्थ यांच्या तक्रारी व मागणीनुसार पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि.16 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.10(जिमाका) :- श्री.दत्तात्रेय विठठल तांडेल व इतर ग्रामस्थ चिखले यांनी ग्रुप ग्रामपंचायत चिखले हद्दीतील स.नं.1/1, 10, 13, 23/0, 41/1, 5/0 मध्ये माती, दगड, झाडे व मुरुम अवैधपणे उत्खनन चालू असल्याबाबत उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्ज/निवेदनाच्या अनुषंगाने वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे, असे उपविभागीय अधिकारी, पनवेल श्री.राहुल मुंडके यांनी कळविले आहे.

मौजे चिखले ता. पनवेल येथील येथील स.नं.1/1, 10, 13, 23/0, 41/1, 5/0 या मिळकती अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग यांच्याकडील आदेश क्र.जमीन -2808/प्र.क्र.-62 /ज-4/ दि.24 ऑगस्ट 2009 तसेच  जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्याकडील आदेश क्र.मशा/ जमीन/अ-2/175535/09 दि.22 डिसेंबर 2009 अन्वये शासकीय जमिनी कब्जा हक्काने विहीत अटी शर्तीनुसार मे.व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि.यांना वाटप करण्यात आलेल्या असून 7/12 मे.व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि.यांच्या नावे दाखल आहे.

मौजे चिखले ता.पनवेल येथील येथील स. नं. 1/1 मध्ये उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या कार्यालयामार्फत मे. व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि. यांच्या वतीने मे.ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि.तर्फे श्री.विनायक विठठल जाधव, रा. पनवेल यांना 6 हजार ब्रास मुरुम/माती उत्खनन परवानगी देण्यात आलेली असून स्वामित्वधनाची रक्कम त्यांनी शासन जमा केली आहे.

मौजे चिखले ता. पनवेल येथील येथील स.नं.1/1 मध्ये तहसिलदार पनवेल यांच्या कार्यालयामार्फत मे.व्हॅल्यूबल प्रॉपर्टीज प्रा.लि. यांच्या वतीने मे.ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि.तर्फे श्री.विनायक विठठल जाधव, रा.पनवेल यांना एकूण 2 हजार ब्रास मुरुम/ माती उत्खनन परवानगी देण्यात आली असून स्वामित्वधनाची रक्कम त्यांनी शासन जमा केली आहे. त्यामुळे मौजे चिखले ता. पनवेल येथील येथील स.नं.1/1, 10, 13, 23/0, 41/1, 5/0 या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत गौणखनिज उत्खननाबाबत अनियमितता असल्याचे अद्यापपर्यंत आढळून आले नाही.

 तरी देखील उपोषणकर्ते श्री.दत्तात्रेय विठ्ठल तांडेल व इतर ग्रामस्थ चिखले यांच्या तक्रारी व मागणीनुसार दि. 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या दालनात सर्व संबधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, पनवेल श्री.राहुल मुंडके यांनी केले आहे.

 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक