जिल्ह्यात दि.1 जानेवारी ते दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर करण्याची परवानगी

 

 

अलिबाग,दि.10(जिमाका) :-  पर्यावरण विभागाच्या दि.22 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयान्वये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2000 च्या अंमलबजावणी संदर्भात नव्याने निर्देश पारित केले आहेत. यासंदर्भात यापूर्वी पारित दि.5 सप्टेंबर 2016 शासन निर्णय अधिक्रमित करून, केंद्र शासनाच्या दि.10 ऑगस्ट 2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उप नियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात दि.1 जानेवारी 2023 ते दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत पुढील दिवस ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 च्या 5 उप नियम (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रीतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सूट द्यावयाच्या दिवसांचा तपशील पुढीलप्रमाणे :- शिवजयंती-1 दिवस (19 फेब्रुवारी), ईद-ए-मिलाद-1 दिवस (दि.28 सप्टेंबर 2023), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- 1 दिवस, होळी पौर्णिमा- 1 दिवस, 1 मे, महाराष्ट्र दिन-1 दिवस, गणपती उत्सव-4 दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी (दि.28 सप्टेंबर 2023), गणपती उत्सव (साखरचौथ गणपती-1 दिवस, नवरात्र उत्सव-3 दिवस (अष्टमी, नवमी व दसरा), दिवाळी-1 दिवस (लक्ष्मीपुजन), ख्रिसमस-1 दिवस, 31 डिसेंबर-1 दिवस,  (टिप:- दि.28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चर्तुदशी व ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आहेत).

ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट ही राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. या प्रकरणी ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील तरतूदीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 19 (अ)नुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक