आधारभूत किंमत भात खरेदी योजनाः जिल्ह्यात केंद्र सुरु; प्रति क्विंटल 1770 रुपये दर


अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- आधारभुत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग रायगड व  आदिवासी उपयोजना क्षेत्रात धान खरेदीसाठी  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत नियुक्त  प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय जव्हार या संस्थेकडील मंजूर भात खरेदी केंद्रांमार्फत कर्जत तालुक्यात भात खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी या खरेदीकेंद्रांवर आपले धान विक्री करुन 1770 रुपये प्रतिक्विंटल या दराने धान विक्री करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा शाखेमार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, आधारभुत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांचेमार्फत खरीप व रब्बी  पणन हंगाम 2018-19 मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर  या तालुक्यातील मंजुर धानखरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे.
जिल्हा मार्केटींग अधिकारी रायगड यांचेकडील मंजुर तालुकानिहाय भात खरेदी केंद्र याप्रमाणे-

अ.क्र
तालुका
सबएजंट संस्थेचे नाव
खरेदी केंद्र
धान खरेदीचा कालावधी
1
कर्जत
नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.
नेरळ
खरीप हंगाम
1 ऑक्टोंबर 2018 ते 31 मार्च 2019
रब्बी हंगाम
1 मे 2019 ते 30 जुन 2019
कशेळे
कळंब
2
श्रीवर्धन
रनिवली विविध कार्यकारी व सेवा सोसायटी लि.श्रीवर्धन
रानिवली
3
पनवेल
पनवेल सहकारीभात गिरणी लि.पनवेल
पनवेल
4
पेण
पेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि.
पेण
वाशी
वडखळ
5
महाड
महाड तालुका शेतकरी सह. ख.वि.संघ
वसाप
6
पोलादपुर
पोलादपुर तालुका सह.खरेदी विक्री संघ लि.
पोलादपुर
7
खालापुर
नेताजी सह.भात गिरणी लि.चौक
चौक
8
माणगाव
माणगाव तालुका शेतकरी सह.ख.वि.संघ लि.
माणगाव
तळेगाव
9
सुधागड
सुधागड तालुका सह.ख.वि.संघ लि.
पाली
परळी
पेडली
झाप
नांदगाव
10
कर्जत
कर्जत तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि.
कर्जत
वैजनाथ
कडाव
11
अलिबाग 
भुवनेश्वर सहकारी भात गिरणी लि.शिरवली, पो.हाशिवरे, ता.अलिबाग
शिरवली


12
रोहा

भैरवानाथ दुध उत्पादक सहकारी संस्था लि. यशवंतखार, मु.पो.यशवंतखार, ता. रोहा
यशवंतखार,
रोहा


एकुण
24
तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात धान खरेदीसाठी  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या मार्फत नियुक्त  प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय जव्हार या संस्थेकडील मंजूर भात खरेदी केंद्रांमार्फत कर्जत तालुक्यात भात खरेदी केली जाणार आहे. ही भात खरेदी केंद्र याप्रमाणे-
जिल्हा
उपप्रादेशिक कार्यालय
तालुका
प्रस्तावित खरेदी केंद्र
जोडलेली गावे संख्या
जोडलेल्या गावांची नावे
रायगड
शहापुर

कर्जत

कशेळे
11
कशेळे, सुगेवे, आंबीवली, जांबरुग, वाकस, कळंब, पोशीर, वारे, अंजप, बोरीवली, आंजड तर्फे गुढवण व संलग्न पाडे

पाथरज
10
पाथरज, खांडस, नांदगाव, चई, सावळे, चेवणे, शिलार, किकवी, धोजे, कोठिंबे व संलग्न पाडे

भात खरेदीचे दर दर्जानुसार याप्रमाणे-
अ.क्र.
भाताचा प्रकार
आधारभुत किंमत प्रती क्विंटल
शेतकऱ्यांना अदा करणेची रक्कम प्रती क्विंटल
1
भात अ ग्रेड
1770
1770/-
2
भात सर्वसाधारण
1750
1750/-


शासननिर्णयानुसार भात खरेदीचे निकष याप्रमाणे-
·         सदरचा भात खरेदीचा कालावधी  हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार खरीप पणन हंगाम कालावधी दि.31 मार्च 2019 पर्यंत तर रब्बी पणन हंगामाकरीता दि.1 मे 2019 ते दि.30 जुन 2019 असा आहे.
·         भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहुन धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र , या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी ), पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.
·         धान खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. त्यासाठी शेतकऱ्याने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी  खरेदी  केंद्र  बंद झाल्यानंतर  खरेदी केंद्रावर आणलेले, परंतु खरेदी न  झालेले धान/ भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहील.
·         आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्ज्याचेच धान/भरडधान्य खरेदी करण्यांत येईल.केंद्र शासनाने हंगाम 2018-19 करीता आद्रतेचे अधिकतम प्रमाण धानासाठी 17% विहीत केले आहे. या प्रमाणापेक्षा आद्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यात येणार नाही.
·         भरडधान्य स्वच्छ व कोरडे असुन ते विक्री योग्य (मार्केटेबल ) असल्याची अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल. मात्र भात आद्रतेच्या विहीत प्रमाणात असल्याची खात्री करुन ते स्विकारल्यानंतर आर्द्रता कटाती लावण्यात येणार नाही. धान खरेदी करताना धान स्वच्छ कोरडे असावे.
·         खरेदी केंद्रावर फक्त खरेदी किंमती बद्दल  दर फलक न लावता आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत असलेले दर्जा,विनिर्देश, खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यु. दर्जाची मानके इत्यादी  बाबतची माहीती  मराठीतुनच फलकावर दर्शविण्यात यावीत.
·         खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाच्या किंमतीतुन, मुख्य खरेदी अभिकर्ता, सहकारी संस्थेच्या कर्जापोटी  शेतकऱ्यांकडुन 40 टक्के पर्यंत कर्जाची रक्कम वसुली करु शकतील .
·         खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पद्धतीने प्रदान करणे बाबत शासनाचे निर्देश आहेत.  अभिकर्ता संस्थांच्या मुख्यालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरेदी केलेल्या धानाची रक्कम अदा कण्यात येईल.  
·         भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहीती जिल्हा मार्केटिंग अधिकारी रायगड-अलिबाग,संबधित तहसिलदार /गट विकास अधिकारी  पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणुन काम करणाऱ्या सह.संस्था/ खरेदी विक्री संघ/ सह.भात गिरणी यांचेकडे उपलब्ध राहील.
तरी शेतकऱ्यांनी दिलेल्या संस्थाकडे जाऊन शासनाच्या हमीभावानुसार भात विक्री करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक