सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश

अलिबाग,दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंधळपाडा, अलिबाग येथे कार्यरत आहे. येथे इयत्ता 8वी पासून गरीब, हुशार, होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती- 80% अनुसूचित जमाती – 3%, विमुक्त जाती भटक्या जमाती – 5%, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनी – 5%, विशेष मागास प्रवर्ग - 2%, अनाथ- 2%, अपंग- 3% यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता (दररोज पोहे /शिरा / उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतूमानानुसार एक फळ व दूध) तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात चपाती, भाजी / उसळ, लोणचे, पापड इत्यादीसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येते. अभ्यासासाठी लागणारे वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600 निर्वाहभत्ता दिला जातो.

तसेच शालेय व गणवेश पात्र महा. विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता दिला जातो. त्याव्यतिरिक्त रेनकोट / छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडा साहित्य, मनोरंजन इत्यादी अनेक सुविधा वसतिगृहात उपलब्ध आहेत.

प्रवेश पात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विद्यार्थीनींकरिता रु.2 लाख 50 हजार च्या आत व विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थीनींकरिता रु.1 लाखांच्या आत असावे.

ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत 1) तहसिलदार यांच्या सहीचा सन 2022-23 मधील उत्पन्न दाखल्याची सत्याप्रत, (2) जातीचे मुलकी अधिका-याचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, 3) मागील इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुण पत्रकाची सत्यप्रत, (4) आधारकार्डची सत्यप्रत, 5) शाळा / कॉलेजचे बोनाफाईड, 6) रेशनकार्ड ची सत्यप्रत, या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.

तरी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे ऑफलाईन फॉर्म भरण्याकरिता तसेच वसतिगृहासंदर्भातील अधिक माहितीकरिता, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबागच्या गृहपाल सौ.यु.एस.गुजेला (8767339974) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक