सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी ग्रंथालयाचा वार्षिक व अंकेक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा

अलिबाग,दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालय संचालकांनी आपल्या ग्रंथालयाचा विहीत नमुन्यामधील परिपूर्ण वार्षिक अहवाल दि.30 जून 2022 पर्यंत व अंकेक्षण अहवाल दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वर, पोस्ट ऑफिस समोर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे सादर करावा, तसेच मिळालेल्या निधीअभावी अनुदान प्राप्त न झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संबंधित शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित ब. पवार यांनी कळविले आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांनी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम 1970 सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री मान्यतेनुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून परीक्षण विविध पद्धतीने केले जाते. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये 170 अनुदान आणि इमारत व साधन सामुग्री सामान्यतः मधील प्रकरण 6 कलम 25 नुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या संचालक आणि ग्रंथालयाची वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे, यानुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक