सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तालुक्यातील मौजे मिळ आदिवासी वाडी येथे शिबिर संपन्न


अलिबाग,दि.13 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील खोपोली मंडळात, मौजे मिळ आदिवासी वाडी येथे सप्तसूत्री कार्यक्रम व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सोमवार दि.13 जून 2022 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग, महिला व बाल संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जातीचे प्रमाणपत्रे, शिधापत्रिकांचे अद्यावतीकरण, उत्पन्नाचे दाखले व येथील ग्रामस्थांना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बालविवाह रोखण्याकरिता ग्रामस्थांमध्ये जनजागृती व उपाययोजनांबाबतही माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास महसूल विभाग, आदिवासी विभाग इत्यादी विभागातील अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक