अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग येथे दि.30 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

अलिबाग,दि.15(जिमाका): अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे दि.30 जून 2022 रोजी, सकाळी ठीक 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

या अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार, समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर, रायगड विभाग श्री.डॉ.संजय लिये यांच्याकडे दि. 24 जून 2022 पर्यंत पोहोचेल अशा रितीने पाठवावी, असे अधीक्षक डाकघर, रायगड विभाग डॉ.संजय लिये यांनी कळविले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक